दिव्यात सचिन राम पाटील यांनी उत्तर भारतीयांची गैरसोय लक्षात घेऊन छटपूजेसाठी स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या सुविधा…
अमित जाधव-संपादक
दिवा (प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार उपशहरप्रमुख श्री सचिन राम पाटील यांनी दिव्यातील उत्तरभारतीय नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या स्वर्गीय जयराम मांगळ्या पाटील गणेश विसर्जन घाट येथे छठपुजेसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असून हा सण उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.
छटपूजा हा विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीतीलच हा एक सोहळा असून, दिवाळीनंतर पाचव्या दिवशी या सोहळ्यानिमित्त व्रताला प्रारंभ होतो. सलग अठ्ठेचाळीस तासांच्या उपवासानंतर मुख्य सोहळा होतो. छटपूजेच्या मुख्य दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास घाटावर रांगोळ्यांचा सडा घालून त्यावर उसाच्या साहाय्याने पूजा मांडली जाते.
सुपामध्ये फळांची मांडणी करून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर साडेपाच ते साडेसहापर्यंत महिला नदीच्या पाण्यात सूप घेऊन सूर्यास्ताच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. मंत्रोच्चारात मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने ही पूजा होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या साक्षीने सोहळ्याची सांगता होते.
स्वर्गीय जयराम मांगळ्या पाटील गणेश विसर्जन घाट या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय महीला भगिनी आणि बांधवांनी सहभाग घेतला.ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील,माजी नगरसेविका सौ.अंकीता विजय पाटील,चेतन पाटील,विजय पाटील,युवा सेनेचे अभिषेक ठाकूर,उपशहर संघटक सौ.प्रियांका सावंत,मचिंद्र लाड,सौ.स्मिता जाधव,प्रतिक म्हात्रे,ओकेश भगत,महेश शितकर,मोहीत गुप्ता,आकाश शुक्ला,संतोष कदम,नितेश पाटील,तुषार सावंत,अनिल साळवे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.