Breaking
ब्रेकिंग

समाजासाठी आता नाही तर कधीच नाही,दिव्यात रस्ते रुंदीकरणात बाधीत “सिद्धार्थ बुद्ध विहार” च्या पूर्णबाधनीसाठी समाजाने यावे एकत्र….* *”एक हात मदतीचा आपल्या विहारासाठी” हे ब्रीद वाक्य घेऊन करा आर्थिक सहकार्य..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे -दिवा शहरात बौद्ध बांधवांची लोकसंख्या पाहता भव्य असे बुद्ध विहार असणे आवश्यक आहे त्यासाठी समाजातील अनेक समाजसेवक व आंबेडकर चळवळीतील नेते एकनाथ भगत व दिनेश पाटील हे अहोरात्र झटत असून स्व खर्चाने जमेल तसे प्रशस्त विहरासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्याच प्रयत्नातून आज छोटेखानी विहार म्हणून सिद्धार्थ बुद्ध विहार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध असताना ते देखील रस्ता रुंदीकरणात बाधित होऊन पदाधिकारी व एकनाथ भगत व दिनेश पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी ते विहार भव्य स्वरूपात साकारण्याचा प्रयत्न करत आहेत पण खर्चिक गणित पाहता आर्थिक अडचणीचां सामना विहराला करावा लागत आहे.सिद्धार्थ बुद्ध विहार हे गेली 13 ते 14 वर्षापासून दिव्यात डौलाने उभे आहे व दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य स्वरूपात 14 एप्रील रोजी जयंती साजरी केली जात आहे तसेच इतर लग्न सोहळे धार्मिक उपक्रम देखील विहारात होत वाहेत.दिव्यात बौद्ध बांधवांची लक्षणीय संख्या पाहता जर प्रत्येकाने या बाधीत विहरासाठी जर मदतीचा हात पुढे केला तर नक्कीच दिव्यात आपण प्रथम भव्य स्वरूपाचे असे विहार पाहू शकतो असे काही ज्येष्ठ समाजबांधवांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

एकनाथ भगत व दिनेश पाटील हे दोन भीम अनुयायी आपल्या स्वखर्चाने जमेल तसे सध्याच्या घडीला विहारसाठी झटत आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन समाजातील प्रत्येकाने ‘एक हात मदतीचा आपल्या विहारासाठी’ पुढे यावे व भविष्यात भव्य दिव्य विहरासाठी शक्य तेवढं आर्थिक सहकार्य करून आपण केलेल्या या योगदानाचे नक्कीच येणाऱ्या काळात नोंद होईल असे धम्मदान करावे व एक संघटिक असे आपले हक्काचे विहार उपलब्ध होऊन पुढील उपक्रम करण्यास आणखी सक्षम होऊ असे यावेळी मंडळाचे खंदे समर्थक बालाजी कदम यांनी बोलतांना विश्वास व्यक्त केला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे