ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील आरोपींना तत्काळ अटक करा व प्रकाश भालेराव यांना पोलीस संरक्षण द्या नवी मुंबई पोलीस री पा ई (आठवले ) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, पँथर द युथ मूव्हमेंट महाराष्ट्र राज्य प्रमुख वर्षा ताई म्हस्के कांबळे…
अमित जाधव-संपादक
ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील आरोपींना तत्काळ अटक करा
व प्रकाश भालेराव यांना पोलीस संरक्षण द्या
नवी मुंबई पोलीस री पा ई (आठवले ) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा,
पँथर द युथ मूव्हमेंट महाराष्ट्र राज्य प्रमुख वर्षा ताई म्हस्के कांबळे यांनी नवी मुंबई आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी-स्वातंत्र्याचे नुकतेच 75 वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना दलिता वर होणारे हल्ले काही केले थांबत नाही अशीच घटना नवी मुंबई येथे घडली आहे विमल पाटील या महिलेने प्रकाश भालेराव व तीन साक्षीदारा यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्त कडे करण्यात आली आहे
प्रकाश सुरेश भालेराव यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की विमल शिवाजी पाटील व सचिन शिवाजी पाटील या महिलेने दिनांक १०/८/२०२२ रोजी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफ आय आर दाखल केलेले होते सदर दोन्ही आरोपी हे त्यावेळेस फरार घोषित करण्यात आले होते त्याच दरम्यान आरोपी विमल पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रकाश भालेराव आणि प्रकरणातील तीन साक्षीदारा विरुद्ध यांच्यावर कलम भा.वि.दा ३५४,४२०,४५६,४६७,४७१,३२३,५०४ असे कामोठे पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकाश भालेराव यांचे म्हणणे आहे की कोणतेही पुरावे नसताना अशा प्रकारचे खोटे गुन्हे सदर विमल पाटील या महिलेने दाखल केलेले आहेत प्रकाश भालेराव यांच्याकडे विमल पाटील या महिलेने व त्याचा मुलगा सचिन पाटील यांनी ऑफिस मध्ये जाऊन पीडित व्यक्तीला मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील आहेत या दोन्ही आरोपीवर कामोठे पोलीस स्टेशन मध्ये दखलपात्र गुन्हे दाखल झालेले असून त्यांच्यावर अद्याप पर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कोणतीही कारवाई झाली नाही तसेच त्यांच्यावर एन सी आर नुसार सुद्धा दोन अ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केलेले आहेत विमल पाटील या महिलेने पीडित प्रकाश भालेराव यांच्यावर अपमान व मानहानी करून जातिवाचक शिवीगाळ करून त्यांच्या अंगाला इजा होइल अशा प्रकारचे मारहाण करण्याचे कृत्य केले खोटा दोष मुक्त दावा काही पुरावे नसताना त्रासदायक कायदेशीर कारवाई केलेली असताना विमल पाटील या महिलेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार त्वरित कारवाई करण्यात यावी व खोटे गुन्हे दाखल केलेले प्रकाश भालेराव व अन्य तीन मुलांची या गुन्ह्यातून सुटका करावी व प्रकाश भालेराव यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्जानुसार करण्यात आली आहे