0
2
0
9
7
4
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या आदेशानुसार २८ सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येत आहे.
याच दिनाचे औचित्य साधून डॉ. विपिन शर्मा, प्रशासक तथा महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, यांच्या मार्गदर्शनानुसार, बुधवार, २८ सप्टेंबर रोजी नरेंद्र बल्लाळ सभागृहात स. ११ वाजता माहिती अधिकाराविषयी जागृती करणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अनिल महाडिक आणि माहिती अधिकार फेडरेशनचे सुभाष बसवेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान, नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी खुले आहे.
0
2
0
9
7
4



