ब्रेकिंग
ठाण्यातील कोपरीमध्ये मोबाईलमधील फोटो डिलीट न केल्याने एका तरुणाची हत्या..
अमित जाधव - संपादक

ठाण्यातील कोपरीमध्ये मोबाईलमधील फोटो डिलीट न केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. स्वयम परांजपे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह त्याचा मित्र मयुरेश धुमाळला अटक केली आहे. स्वयमने आपल्या मैत्रिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. मात्र हेच फोटो डिलीट न केल्याने त्याची घरात घुसून कोयत्याने हल्ला करत हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.