Breaking
ब्रेकिंग

साबे गावातील महापालिकेच्या व्यायामशाळेची पुनर्बांधणी करून नवीन व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बनवा – दिवा मनसेची मागणी.

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे -दिवा शहरातील डीजी कॉम्प्लेक्स, साबेगाव येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मला लागून महापालिकेची जुनी व्यायाम शाळा अस्तित्वात होती. परिसरातील अनेक तरुण या व्यायामशाळेचा वापर करायचे. पण कालांतराने ही व्यायाम शाळा जुनी झाल्याने धोकादायक झाली होती. अंदाजे दोन वर्षांपूर्वी धोकादायक अवस्थेत असलेली हि व्यायाम शाळा महापालिकेने जमीनदोस्त केली होती. सध्या याच ठिकाणी तिचे भग्नावस्थेत अवशेष दिसून येतात.

सदर ठिकाणी भविष्यात कुठलेही अतिक्रमण होऊ नये म्हणून महापालिकेने तिथे तारेचे कुंपण करून घ्यावे. तसेच सदर जागेवर पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या माध्यमातून व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नव्याने तयार करण्याची मागणी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांची भेट घेवून केली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव प्रशांत गावडे आणि विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे