बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात कोकण वासीयांसाठी गणपती उत्सव निमित्त डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली मोफत बस तिकिटांचे वाटप….

मोफत बस तिकिट वाटप -शिवसेना दिवा शहर!
गणपती उत्सवा निमित्त….
रायगड़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सातारा, सांगली येथील चाकरमणी बंधु -भगणींसाठी सलग यावर्षी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय खासदार डॉ.श्री.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सौजन्याने आणि शिवसेना दिवा शहर यांच्या अधिपत्याखाली आज रोजी, गणेश उत्सवा निमित्त आपल्या गावी प्रयाण करणारे, दिवा शहर रहीवासी यांचा प्रवास, सुलभ आणि मोफत व्हावा यासाठी, “मोफत बस तिकीट “वितरण कार्यक्रम आज 21 ऑगस्ट 2022 रोजी सिद्धिविनायक गेट येथे सायं.6.30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमासाठी, गणेश उत्सवा निमित्त जाणारे चाकरमणी यांची लक्षणीय उपस्थिती, “मोफत बस तिकीट”स्वीकारण्यासाठी होती असे दृश्य दिसून आले. सदर कार्यक्रम शिवसेना दिवा शहर प्रमुख आणि मा. उपमहापौर श्री. रमाकांतजी मढवी साहेब यांच्याहस्ते तिकीट वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना दिवा शहर विभाग प्रमुख श्री. उमेश भगत, मा. नगरसेवक श्री. अमर ब्रह्मा पाटील, मा.नगरसेविका सौ.दिपाली उमेश भगत,मा. नगरसेवक श्री. दिपक जाधव, मा. नगरसेविका सौ. दर्शना चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख श्री. गुरुनाथ पाटील, विभागप्रमुख श्री. भालचंद्र भगत, शिवसेना संघटक advocate श्री. आदेश भगत, संघटक श्री. निलेश पाटील, सौ. अर्चना पाटील, सर्व शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला संघटक पदाधिकारी यांच्या हस्ते,बस तिकीट वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनोद पाटील सर यांनी करुन, उपस्थित जनसमुदायास माननीय श्री. रमाकांतजी मढवी जी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, या प्रवासाची दिशा आणि गती आदरणीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे  आणि खासदार डॉ. श्री. श्रीकांतजी शिंदे यांची संकल्पना असुन, त्यांच्या सामान्य लोकां पर्यंतची बांधीलकी जपण्याचा हा प्रयत्न, आपला प्रवास आणि सण, उत्सव आनंद आणि सुखमय व्हावा हाच उद्देश आहे, असे विचार मांडले! दिवा शहर नागरीक यांच्या वेदना आणि अपेक्षा या माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे  आणि कर्तव्यनिष्ठ खासदार डॉ. श्री. श्रीकांत शिंदे  यांच्या सतत अग्रस्थानी असतात, आणि त्या सोडविण्याचे त्यांचें पहिले प्रयत्न असतात, ऍड श्री. आदेश भगत यांनी स्पष्ट केले.सदर कार्यक्रमाला असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, महीला पदाधिकारी आणि नागरीक यांचा उत्सफुर्त प्रतिसाद दिसून आला.सदर प्रवासाची तारीख 28 ऑगस्ट 2022 रोजी ठिक.4 .00 वाजल्या पासून एकुण 80 ते 85 बस ,विभागा नुसार मार्गस्त केल्या जातील, याची दक्षता आणि सुखरुप प्रवासाच्या शुभेच्छा देवून, कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मा. नगरसेवक अमर पाटील,मा. नगरसेवक दीपक जाधव,मा. नगरसेविका दीपाली उमेश भगत,मा. नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे ,मा.नगरसेवक  शैलेश पाटील,मा. सुनिता गणेश मुंडे, अर्चना निलेश पाटील,शशिकांत पाटील,भालचंद्र भगत,आदी पद्धधिकारी उपस्थतीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे