Breaking
ब्रेकिंग

कळवा, मुंब्रा- कौसा, भारत गिअर्स, शिळफाटा, उत्तरशिव, दहिसर येथील वनखात्याच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे व मोठमोठी गोदामे, वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्दा प्रशासनाचे दुर्लक्ष….शरद गुणाजी पाटील,मनसे खर्डी गाव- प्रभाग अध्यक्ष

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

 

ठाणे – कळवा, मुंब्रा- कौसा, भारत गिअर्स, शिळफाटा, उत्तरशिव, दहिसर येथील वनखात्याच्या जमिनीवर परप्रांतीयांनी अनाधिकृत बांधकामे करून हजारो एकर जमिनी बळकावल्या आहेत.सन २००९ पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खर्डी विभाग अध्यक्ष श्री.शरद गुणाजी पाटील हे पत्राद्वारे प्रशासनास वेळोवेळी धारेवर धरत असून सुध्दा आजतागायत या प्रकरणी कुठलीही कारवाई झाली नाही. या परिसरातील सरंक्षक भिंतीचे काम येथील गोडाऊनांमुळे अपूर्ण राहिले असून उर्वरीत वनखात्याच्या जमिनीवर झपाट्याने अनाधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढत होत असून गोडाऊन बांधण्यासाठी तेथील झाडे तोडून निसर्गाची हानी करून काही ठिकाणी आग लावण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. अशा घटना सासत्याने घडत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना त्याचे जीव गमावावे लागत आहेत. आज परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, वेळीच या वनखात्याच्या जमिनीवर बांधलेल्या बांधकामांवर कारवाई केली नाही तर भविष्यात परिस्थिती हाताच्या बाहेर जाणायाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बांधकामे करणाऱ्या मालकांची चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा या साठी करोडो रुपयांचा निधी खर्च करीत आहे तर दुसरीकडे जमिन बळकावणारे अशा प्रकारे वनाचा हास करीत आहे.

या बाबीला वेळीच आवर घातको नाहीतर उरले सुरले जंगल नष्ट होऊन जाईन. विशेष खे दाची बाब म्हणजे संबंधित नियुक्त अधकारीवर्ग सदर बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. या विषयाची गंभीर दखल घेवुन कारवाई करण्याचे संबंधीतांना आदेश व सुचना द्यावी अन्याथा आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन छेडावे लागेल जर या गोष्टीची दखल न घेतल्यास येत्या काही दिवसातच डोंगरालगत असलेल्या वनखात्याच्या जमिनीवर कब्जा करून जमिनीवर अनाधिकृत गोडाऊन बांधण्यात येतील असे चित्र सध्या दिसुन येत आहे तरी कृपया आपण ही बाब गांभीर्याने घेवून लवकरांत लवकर वनखात्याच्या जमिनींवर बांधण्यात आलेल्या गोडाऊनवर कारवाई करून वनखात्याची जमिन त्वरित ताब्यात घ्यावी असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे