Breaking
ब्रेकिंग

मनसेच्या इशाऱ्यानंतर अखेर शौचालयाचे काम पूर्ण..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

दिवा स्टेशन, मच्छी मार्केट जवळील ठाणे महापालिकेचे शौचालय गेल्या कित्येक महिन्यांपासून खुलं करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः महिलांना याच जास्त त्रास जाणवत होता. येथील महिलांनी आमदार राजुदादा पाटील यांच्याकडे याची तक्रार केल्यानंतर मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सदर शौचालय २ दिवसात नागरिकांसाठी खुलं न केल्यास मनसे ते नागरिकांसाठी खुलं करेल असा इशारा ठाणे महानगरपालिकेला शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून दिला होता.

मनसेच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाल्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टी असूनही महापालिकेने पाण्याची जोडणी, विजेचा मीटर, आतील वायरिंग ची कामे पूर्ण करून वीजपुरवठा देखील सुरळीत करून घेण्यात आला. शौचालयाची जवळपास सर्व कामे पूर्ण झाली असून पुढील २ दिवसात इतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून शौचालय नागरिकांना वापरासाठी खुलं करू असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे