Breaking
ब्रेकिंग

पंतप्रधान मोदी यांच्या अमृत भारत योजनेत 508 स्थानकात दिवा शहराचा समावेश,त्याचाच एक भाग म्हणून सरकत्या जिण्यासह स्कायवॉक नागरिकांसाठी खुला…दिवा भाजप

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकात समाविष्ट केलेल्या 508 स्थानकात दिवा रेल्वे स्थानकही आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रेल्वे प्रशासनाने दिवा पूर्वेकडील सरकत्या जिन्यांना रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यान्वित केले. आणि त्याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी दिवा भाजपने दिवा रेल्वे स्टेशन मास्तर व इतर सर्व रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करून सर्व प्रवाश्यांना पेढे वाटले. आणि रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री.तुकाराम भोईर यांचा दिवा भाजपने विशेष सन्मान केला. याप्रसंगी दिवा भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी श्री. विजय भोईर यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच श्री सचिन भोईर यांनीही प्रवाशांना आवाहन केले की सर्वांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ न ओलांडता या सरकत्या जिन्याचा वापर करून आपला बहुमोल जीव वाचवावा. यावेळी विनोद भगत, भोईर,युवराज यादव, रेश्मा पवार,समीर चव्हाण, सतीश केळशिकर, अमरनाथ गुप्ता,राजेंद्र आंब्रे,जीलाजित तिवारी,प्रफुल साळवी,आशिष पाटील, शैलेश भोईर, विद्यासागर दुबे, धर्मेंद्र गुप्ता , मनोज यादव, गयादिन यादव,महेंद्र विश्वकर्मा, चंद्रकला सिंह, निर्मला पटेल, निशा सिंह, संध्या कुशवाहा, विभा पांडे, शीतल लाड, संजना गावडे,समिधा वाघमारे ई. कार्यकर्ते यावेळी हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे