बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून डायघर ग्रामस्थांचा यंदा निवडणुकांवर बहिष्कार ..

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ३० मार्च : ठाण्यातील शिळफाटा येथील डायघर गावातून मतदान केंद्रावर आणि संपूर्ण निवडणूकांवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. डायघर येथे बेकायदेशीरपणे महापालिका प्रशासनाने कचरा टाकण्यासाठी डम्पिंग तयार करून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. बळजबरीने लादलेले हे डम्पिंग असून नागरिकांनी अनेक ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही शासन, प्रशासन किंवा राजकिय नेते जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. प्रकरणी ग्रामस्थांनी संबधित स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक व पालकमंत्री आणि विशेष करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्यासमवेत सर्वांना रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना न्याय मिळण्यासाठी खूप वेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली असता अद्याप या नागरिकांना अजूनपर्यंत कुठलाही नेता किंवा प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही.

ज्यांना जनकल्याणासाठी जनतेने निवडून दिले ते जनसेवक आज अश्याप्रकारे त्याच जनतेवर अन्याय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर डम्पिंगवर पडणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया ही योग्य प्रकारे होत नाही तसेच ठाणे मनपा कडून मोठया प्रमाणात ओला कचरा टाकला जात आहे त्यामुळे ग्रामस्थ व येथे आजूबाजूला जे नव्याने वसलेले रहिवासी इमारती आहेत ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक राहत असून लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तरुण या सर्वांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारपणाने त्रस्त झालेले आहे, एकीकडे स्वच्छतेवर करोड रुपये खर्च केला जातो आणि दुसरीकडे नागरिकांना अस्वच्छतेमुळे आजाराला सामोरे जावे लागते ही तर जीव घेणारी स्वच्छता आहे की काय..? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. डम्पिंग जोपर्यंत लोकवस्ती मधून हटत नाही तोपर्यंत आमच्याकडून निवडणूकांवर बहिष्कार कायम असेल ही भूमिका घेत स्थानिक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

……………………………
आमच्याकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहे संबंधित सरकारी जितके संस्था आहेत त्या सर्वांना कळवले तरी सुद्धा अधिकारी वर्ग यांनी आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळे सर्वानी एकजूट होऊन निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला,भविष्यात डम्पिंग हटवले नाहीतर जवळपास लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

*कु.संतोष पाटील*

आम्ही महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडे रितसर तक्रार दिली असून संबंधित विषय गंभीरपणे घेत आहोत त्यासाठी स्वतःमाझा मुलगा न्यायालय प्रक्रियामध्ये सहभाग होऊन डम्पिंग विरोधात सर्व कागदपत्रे जमा करून कसे न्याय मिळवून घेता येईल यासाठी पूर्ण ताकदीने काम करतोय.
*माजी नगरसेवक हिरा पाटील*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे