
मुंबई- शालेय शिक्षणात हिंदी सक्तीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच भाजपच्याच पदाधिकाऱ्याने भाजप सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपाचे दिवा मंडळाचे कायदा सेल संयोजक ऍड. रविराज बोटलेंनी मराठीसाठी पाऊल उचलले. ते 5 जुलै रोजी कार्यकर्त्यांसह मनसेच्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात सहभागी होतील. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा रंगली.