ब्रेकिंग
मुंबईसह पालघर, कल्याण, ठाणे या ठिकाणी उद्यापासून तीन दिवस दारुची दुकाने बंद..
अमित जाधव - संपादक
उद्यापासून तीन दिवस दारुची दुकाने बंद
उद्यापासून तीन दिवस मुंबईमध्ये ड्राय डे असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदारसंघामध्ये मतदान आहे, त्या मतदारसंघात आणि नजीकच्या मतदारसंघात ड्राय डे पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबईसह मतदान असलेल्या मतदारसंघात 18 ते 20 मे मद्यबंदी असणार आहे. सोमवारी मुंबईसह पालघर, कल्याण, ठाणे या मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे उद्यापासून तीन दिवस दारुची दुकाने बंद असणार आहेत.