
आज दिनांक ०४/०४/२०२५ रोजी १६:४० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार दिवा दातिवली स्मशानभूमी जवळ, दातिवली, दिवा, ठाणे. या ठिकाणी सिताराम नगर येथील लक्ष्मी निवास तळ + ४ मजली, रिकामी असलेली इमारत या इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड तुटून लटकत होती. सदर घटनास्थळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (दिवा प्रभाग समिती) व अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.असे यावेळी कळविण्यात आले आहे
सदर घटनास्थळी तुटून लटकत असलेली पत्र्याची लोखंडी शेड अग्निशमन दलाचे जवान यांनी बाजूला केली असून घटनास्थळाचा धोका दूर केला आहे.असे जवानानी बोलताना स्पष्ट केले