Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता :- उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता :- उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री

ठाणे :- राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत #कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य आहे, असे मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी सांगितले.

राज्यात रुग्णांमध्ये #फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची तात्काळ #आरटीपीसीआर चाचणी करा, राज्यातील चाचण्यांची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी राज्यातील सर्व वरिष्ठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या #कोविड ई-आढावा बैठकीत दिले.

लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देताना ९ महिन्यांचा कालावधी कमी करण्याबाबत आपण केंद्र शासनाला पत्र पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने दक्ष राहावे. सागरतटीय जिल्ह्यांमध्ये #चक्रीवादळ ची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करा. विभागीय सीएमओ ने कार्यक्षमतेने स्थानिक प्रश्न सोडवावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे