Breaking
ब्रेकिंग

दिवावासीय व सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ-मा. उपमहापौर रमाकांत मढवी

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवावासीय व सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ-मा. उपमहापौर रमाकांत मढवी

दिव्यातील अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते संभ्रबात असताना शेवटी मा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना ही अखेर पासून होती व आता देखील मोठ्या जोमाने काम करण्यास सज्ज झाली आहे असे दिव्यातील मा.उपमहापौर रमाकांत मढवी जी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यात भरीव निधी देऊन अनेक कामे मार्गी लावलेत व पुढेही दिवावासीयांच्या सेवेसाठी तत्पर असून बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असून हिंदुत्ववादी व मराठी माणसाच्या हिताचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सदैव तत्पर राहून काम करत आहोत असे मढवी जी यांनी सांगितले.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आनंदात आहेत हा सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांचा विजय आहे.
दिवा शहर ठाणे जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्याची शिदोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मा.रमाकांत मढवी यांच्याच हाती आहे त्यामुळे हा गड अभेद्य असून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या मार्गदर्शनाने पुढे जात आहे असे काही जैष्ठ शिवसैनिकांनी यावेळी सांगितले
तसेच ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्या मागे सामान्य कार्यकर्ता किंवा शिवसैनिक जाणार नाही बाळासाहेबांच्या विचाराववर चालणाऱ्या मा. एकनाथ शिंदे यांच्या मागे खंबीर पणे शिवसैनिक उभा राहील असे देखील मढवी जी नि सांगितले दिव्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे नी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मोठे हिताचे निर्णय घेत निधीची तरतूद करून विकास कामे मार्गी लावलेत.कोरोना काळात देखील एकनाथ शिंदे नि दिवावासीयांन साठी धावून आलेत व त्यांच्या भक्कम पाठ पुराव्यामुळेच दिव्यात भारतातील सर्वात मोठा व सर्वात पहिला 10 हजार लसचा कोरोना लस्सीकरन महोत्सव भरविण्यात आला होता हे देखील दिवावासीयांना माहिती असून त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही असे ही रमाकांत मढवी जी नि स्पष्ट केलं

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे