Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजप गुजराती सेल संविधान दिवस मोठ्या उत्साहात संपन्न…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

दिवा/ ठाणेभाजपा दिवा शहर, गुजराती सेल, अध्यक्ष श्री अशोक सोलंकी यांनी त्यांच्या कार्यालयात संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा केला .तसेच संविधान दिवस पर नेहमी समाजकार्यात पुढाकार घेणारे अशोक सोलंकी ह्यानी त्यांच्याच कार्यालयात मध्ये, त्यांच्या कर्मचारी सोबत बाबासाहेबांचे प्रतीमेला पुष्पहार अर्पण करत व संविधान ला पुष्पांजली करून, महिलांचा सत्कार करत त्यांना मिठाई भरुन संविधान दिवस साजरा केला,

26 नोव्हेंबर रोजी भारतात सर्वत्र संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे.संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहे.संविधान म्हणजे देश्याच्या राज्यकारभारासबंधी व विविध तरतुदींचा दस्ताऐवज होय.नागरिकत्व,नागरिकांचे हक्क तसेच महिला व दुर्बल घटकांच्या हक्कावर अतिक्रमण केले जाते तेव्हा न्याय मिळावा म्हणून त्यांचे स्वातंत्र अबाधित रहावे यासाठी संविधान कामी येते.तसेच कायद्याचे संरक्षण मिळावे यासाठीच्या तरतुदी या संविधानात करण्यात आल्या आहेत.आज महिला याच संविधानाच्या जोरावर राष्ट्रपती पदांसह अनेक मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
यानुसारच दिव्यातीलही महिलांचा गौरव करण्यासाठी संविधान दिनी सामाजिक क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील विविध पदावर असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर बनावे.त्यांना त्यांचा हक्क मिळावा असेही यावेळी अशोक सोळंकी यांनी बोलून दाखविले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे