बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मुंब्रा कळवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू,मागील दोन महिन्यांतील पाचवी घटना…

अमित जाधव - संपादक

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान शुक्रवारी ही घटना घडली आहे. हा तरुण कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या लोकलने प्रवास करत होता. तोल जाऊन तो लोकलमधून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मागील दोन महिन्यातील ही पाचवी घटना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे