Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला; दोन आरोपीना गावठी कट्टा व चाकूसह तासभरात केल  अटकेत.. दलदलीतील गटारीच्या पाण्यात तब्बल दोन तास लपून बसलेले आरोपी, ठाणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…

अमित जाधव -संपादक

0 2 6 2 3 5

दिवा | प्रतिनिधी-दिवा पूर्व येथील साबेगाव परिसरातील श्री खेडादेवी ज्वेलर्स दुकानावर पिस्तूल दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली. आरोपींकडून गावठी कट्टा व चाकू जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास बारकू म्हात्रे  कंपाऊंड, साबेगाव, दिवा येथील श्री खेडादेवी ज्वेलर्स येथे दोन अनोळखी इसम घुसले. दुकानमालक शंभू सिंग यांना त्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. यावेळी दुकानमालकांनी प्रतिकार करताच आरोपींनी त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. या हल्ल्यात शंभू सिंग किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेनंतर समोरील दुकानदार मदतीसाठी धावून आले असता आरोपींनी त्यांनाही पिस्तूल दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र दुकानमालकाच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपींना कोणताही मुद्देमाल लंपास करता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच सपोनि खतेले व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सपोनि तोरडमल, सपोनि सावंत आणि सपोनि माने यांच्या पथकांना चुहा ब्रिज, दिवा रेल्वे स्टेशन, डीजे कॉम्प्लेक्स व साबेगाव परिसरात शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अथक शोधमोहीमेनंतर आरोपी दलदलीतील गटारीच्या पाण्यात तब्बल दोन तास लपून बसलेले आढळले. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गटारीत उतरून शोध घेत दोघांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे :

  1. श्रवणकुमार ब्रम्हदेव पटवा (वय 37)
    मुळ रा. बेलभरिया, उत्तर प्रदेश
    सध्या रा. विष्णू अपार्टमेंट, साबेगाव, दिवा पूर्व
  2. ध्रुव विश्वनाथ पटवा
    मुळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश
    सध्या रा. गणेश चाळ, गोकुळ नगर, ठाणे
    सदर कारवाईदरम्यान घटनास्थळी मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. शिंदे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले (गुन्हे शाखा), अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख (पश्चिम प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, डीसीपी अमरसिंग जाधव, एसीपी शेखर बागडे तसेच श्रीमती प्रिया डमाळे (कळवा विभाग) यांनी भेट देऊन पाहणी केली.
    या धाडसी कारवाईमुळे मुंब्रा पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून दिवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे