0
2
0
9
7
4
सीएसएमटीवरून धावली पहिली ट्रेन
मध्य रेल्वेने सीएसएमटी व ठाणे स्थानकावर घेतलेला मेगाब्लॉक आता संपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 1 वाजून 10 मिनिटांनी टिटवाळ्यासाठी पहिली लोकल सुटली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. लोकल बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. मुंबईत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पण आता लोकल पून्हा धावायला सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा आनंद होत आहे.
0
2
0
9
7
4



