Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व मा.आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयाअंतर्गत मोफत दाखले वाटप शिबीर…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य ठाकरे व संपर्कप्रमुख कल्याण लोकसभा, मा. आमदार श्री.सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), युवासेना दिवा शहर आणि तहसीलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न झाले

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य ठाकरे साहेब व संपर्कप्रमुख कल्याण लोकसभा, मा. आमदार श्री.सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त उपशहर प्रमुख दिवा श्री.सचिन पाटील, शहर अधिकारी युवासेना श्री.अभिषेक ठाकूर, विभागप्रमुख दातिवली श्री.गुरुनाथ नाईक आणि तहसीलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी सुमित हॉल दिवा पूर्व येथे करण्यात आले होते.
येथील शिबिरात दाखला मिळविण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले असून .त्यांना आगामी आठ दिवसात दाखले देण्यात येणार आहेत.
या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला,अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखला यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कागदपत्रांची तपासणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले देण्यात येणार आहेत.
शाळा – कॉलेज सुरू होणार आहेत. या स्थितीत नागरिकांना वेळेवर दाखले मिळणे आवश्यक असते. त्यामुळे एकाच छताखाली विविध दाखले मिळत असल्याने दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला. दाखल्यांसाठी नागरिकांकडून लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
सदर प्रसंगी कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख श्री.अरविंद बिरमोळे, माजी नगरसेविका सौ.अंकिता पाटील, युवानेते श्री.सुमित भोईर, उपशहर प्रमुख दिवा श्री.सचिन पाटील, शहर अधिकारी युवासेना दिवा श्री.अभिषेक ठाकूर, उपशहर संघटिका सौ. योगिता नाईक, विभागप्रमुख श्री.गुरुनाथ नाईक, श्री.मछिंद्र लाड, श्री.राजेश भोईर, श्री.चेतन पाटील, विभाग संघटिका दिवा सौ.स्मिता जाधव, उपविभाग संघटिका सौ.विनया कदम, उपविभाग प्रमुख श्री. गुरुनाथ पाटील, सचिव युवासेना दिवा श्री. उमेश राठोड, उपशहर अधिकारी युवासेना श्री.अक्षय म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक श्री.विराज सुर्वे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे