Breaking
ब्रेकिंग

रासरंग 2022 साठी ठाणेकर नागरिक सिद्ध,;नैतिक नागडा यांच्या तालावर थिरकणार 12000 ठाणेकर…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

रासरंग 2022 साठी ठाणेकर नागरिक सिद्ध,;नैतिक नागडा यांच्या तालावर थिरकणार 12000 ठाणेकर

ठाणे शहरातील मॉडेलला मिल कंपाऊंड चेक नका परिसरात दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत रास रंग 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. 2017 सालापासून महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उल्लासात या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

यावर्षी देखील अतिशय जल्लोषात आणि उत्साहात रास रंग ठाणे 2022 आयोजन करण्यात आल असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि युनिटचे अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि श्री सचिन मिराणी यांनी दिली.

यावर्षी देखील बारा हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणी आणि अबालवृद्ध रास गरबा प्रेमी या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होतील अशी माहिती आहे .

गेली पाच वर्षे सातत्याने ढोल सम्राट नैतिक नागडा यांच्या तालावर ठाणे आणि मुंबईकर बेभान होत आहेत यावर्षी देखील असाच उत्साह गरबा प्रेमी नागरिकांमध्ये दिसून येत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी पासून दसऱ्यापर्यंत या उत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल असं श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं.

नैतिक नागडा यांच्यासह अनेक नामवंत गायक आणि वादक या कार्यक्रमात आपली कला सादर करतील आणि ठाणेकर तसेच मुंबईकर नागरिकांना  आपल्या तालावर थीरकायला भाग पाडतील .

12000 बारा हजार नागरिक या ठिकाणी एकत्र येणार असल्याकारणाने सुरक्षेची चोख व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
सीसीटीव्हीची नजर सर्वत्र असणार आहे तसंच अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
ठाणेकर नागरिकांनी उत्साहाने ठाणे शहरातील सगळ्यात मोठ्या या गर्भ उत्सवात सहभागी व्हावं अस आवाहन श्री जितेंद्र मेहता यांनी केल आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे