Breaking
ब्रेकिंग

यंदा 144 कल्यान ग्रामीण विधानसभेची लढत चूरशीची…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.गेल्या वेळी या भागातून मनसेचे आमदार असलेले राजू पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. तर उद्धव ठाकरे च्या शिवसेनेकडून सुभाष भोईर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेने कडून राजेश मोरे रिंगणात आहेत.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी हे आगरी समाजाचे लोक आहेत.  मात्र राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या मराठी भाषिक, दक्षिण भारतीय, गुजराती भाषिक मतदारांसोबतच मोठ्या संख्येने हिंदी भाषिक मतदारही येथे राहतात.
गेल्या वेळी येथून मनसेचे उमेदवार राजू पाटील विजयी झाले असून, ते पुन्हा रिंगणात आहेत.  साहजिकच त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये चांगल्या कामाची पोच पावती आहे.
तसेच  2014 साली आमदार झालेले सुभाष भोईर यांचा त्या काळात चांगला कार्यकाळ होता आणि त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा आजही चांगली आहे.  गेल्या निवडणुकीतही ते पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.  यावेळी शिवसेनेच्या उद्धव गटाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर शिंदेच्या शिवसेने कडून राजेश मोरे व रमाकात मढवी हे दोन मातब्बर इच्छुक असताना शेवटच्या क्षणी राजेश मोरे यांच्या गळ्यात उमेदवारची माळ पडली शेवटी नाराज असलेल्या मढवी यांनी एक पाऊल मागे होत शिंदे साहेबांच्या विजयासाठी काहीही करू पण मुख्यमंत्री शिंदे साहेबच असतील असे व्यक्तव्य करून राजेश मोरे यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजेश मोरे हे  ही  सल्लग पाच वेळा नगरसेवक पद भूषविलेला व्यक्ती आहे असे ही यावेळी काही निवडणूक तज्ञ यांच्या मते समजते त्यामुळे ही लढत अत्यंत चूरशीची होऊन दोन माजी आमदार पैकी एकाच्या गळ्यात विजयाची माळ पडते कि शिंदेचा तिसराच उमेदवार उडी घेतो हे आता जनताच ठरवेल.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे