Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंब्र्यात ५०० जणांकडे वीज बिलाची १० कोटीची थकबाकी……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुंब्रात ५०० जणांकडे वीज बिलाची १० कोटीची थकबाकी
या मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा टोरंट चा इशारा

प्रतिनिधी- थकीत वीज बिल वसुलीसाठी सगळीकडे राज्यात जोरदार प्रयत्न सुरू असताना मुंब्रा परिसरात जवळपास ५०० जणांनी वीज बिलाची १० कोटीच्या आसपास रक्कम थकवली असल्याचे उघड झाले आहे. मार्च २०२० पासून कळवा-मुंब्रा- दिवा परिसराच्या वीज पुरवठा व वितरणाची जबाबदारी महावितरणने फ्रँचाईझी म्हणून टोरंट पॉवर कंपनीकडे सोपवली आहे.

कोरोनाच्या लाटेमुळे लादलेले निर्बंध आता काहीसे शिथील होत असताना राज्यात सगळीकडे वीज बिल वसुलीचे काम जोरात सुरू झाले आहे. वारंवार सूचना देऊनही मुंब्रा परिसरात ४५० ते ५०० असे ग्राहक आहेत, जे लोक वीज नियमित वापरत असूनही त्याचे बिल मात्र भरत नाहीत. यांची एकत्रित थकबाकी १० कोटींच्या घरात पोचली आहे. यात काही बड्या असामी देखील असून टोरंट कंपनीने अश्या ग्राहकांची यादी तयार केली आहे. थकीत वीज बिल भरावे यासाठी ग्राहकांना वारंवार सूचना दिल्या जात असून वीज बिल वसुलीसाठी यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असे कंपनीच्या सूत्रानी सांगितले. या ग्राहकांना कंपनीकडून पेमेंटसाठी एक अंतिम सूचना दिली जाईल, आणि पेमेंट न झाल्यास त्यांच्यावर कंपनीकडून कठोर कारवाई केली जाईल असेही टोरंट कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कळवा-मुंब्रा-दिवा परिसरात २.८० लाखावर अधिकृत ग्राहक असून मुंब्रा परिसरात ९० हजारावर ग्राहक आहेत. बिलाबाबत काही तक्रार असल्यास ग्राहकानी टोरंट कंपनीच्या ग्राहक कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे