Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळले प्लॅस्टिकच्या बॅगेत……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

⭕️मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळले प्लॅस्टिकच्या बॅगेत……

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक

मुंबई, ता 30, मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे एका प्लॅस्टिकच्या बॅगेत आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असून या अज्ञात व्यक्तीच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास कार्य सुरू केले असून मृतदेह सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

माहितीनुसार, एका ४५ वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असून अँटॉप हिल येथील सेक्टर ७ मधील एसीपी कार्यालयाच्या मागच्या बाजूस मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून प्लॅस्टिकच्या बॅशेत टाकण्यात आले होते. हा एका पुरुषाचा मृतदेह असून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मुंडकं गायब करण्यात आले आहे. घटनास्थळी डीसीपी, एसआरपीआय आणि झोन ४ गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचले असून त्यांचे तपास कार्य सुरू आहे. हत्ये मागचे नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. हा मृतदेह सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे