Breaking
ब्रेकिंग

दिवा स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कारवाई करा,अन्यथा आंदोलन.दिवा मनसेचा इशारा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

♦दिवा स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कारवाई करा,अन्यथा त्रिव आंदोलन.दिवा मनसेचा इशारा…

 

ठाणे,दिवा ता 7 नोव्हे : अनधिकृत फेरीवाले व बेशिस्त रिक्षा चालक यांच्या विरोधात दिवा शहर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दिवा स्टेशन परिसरातील व मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यासाठी अनेक संघटना, राजकिय पक्ष यांनी वारंवार आवाज उठवला आहे. मनसेकडूनही वारंवार प्रयत्न करत आसल्याने या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या वतीने पोस्टर जाहीर करून देण्यात आला आहे.
स्थानिक फेरीवाले व बेशिस्त रिक्षा चालक प्रशासन याबाबत ठोस कारवाई यांचा निकाल आता लावायचाच अशा आशयाचे पोस्टर दिवा मनसेच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने फेरीवाले बेशिस्त रिक्षा चालक यांच्याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिवा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे