Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज 521 नामनिर्देशनपत्रांचे वाटप* *13 उमेदवारांचे अर्ज दाखल..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8
ठाणे (27) ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (27.12.2025) ठाणे शहरातील 9 प्रभागातून आज एकूण 521 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभागसमितीनिहाय ‍नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
          तर उथळसर प्रभाग समितीतून 8 उमेदवारांनी, कळवा प्रभाग समितीतून 2 दोन उमेदवारांनी, मुंब्रा प्रभागसमितीतून एका उमेदवारांनी तर दिवा प्रभागसमितीतून 2 दोन उमेदवारांनी असे एकूण 13 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले.
           दिनांक 23, 24, 26 व 27 डिसेंबर 2025  या चार दिवशी मिळून एकूण 3599 उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले.
*प्रभागसमितीनिहाय आकडेवारी*
 *(प्रभाग क्रमांक 1,2,3,8) माजिवडा मानपाडा प्रभागसमिती – 65*
*(प्रभाग क्रमांक 4,5,7) वर्तकनगर प्रभागसमिती – 53*
*(प्रभाग क्रमांक 6,13,14,15) लोकमान्य सावरकर प्रभागसमिती – 100*
*(प्रभाग क्रमांक 16,17,18) वागळे प्रभागसमिती – 58*
*(प्रभाग क्रमांक 19,20,21,22) नौपाडा- कोपरी प्रभागसमिती – 60*
*(प्रभाग क्रमांक 10,11,12) उथळसर प्रभागसमिती – 34*
*(प्रभाग क्रमांक 9,23,24,25) कळवा प्रभागसमिती – 39*
*मुंब्रा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 26,31, 30, 32) – 49*
*दिवा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 27,28, 29, 33) – 63*
 *प्रभागसमितीनिहाय नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष*
 *उथळसर प्रभागसमिती*
1.      *नागले  लतिका संतोष – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी*
2.      *अंकिता अनिल शिंदे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )*
3.      *वहिदा मुस्तफा खान – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )*
4.    *नजीब सुलेमान मुल्ला – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )*
5.    *देसाई सुहास सूर्यकांत – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी*
 *कळवा प्रभागसमिती*
1.      *समीर साहेबराव नेटके – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)*
2.     *रविकांत नामदेव धोंड – अपक्ष*
 *मुंब्रा प्रभागसमिती*
1.      *अकबर अजीज खान – अपक्ष*
        *दिवा प्रभाग समिती*
1.      *शैलेश मनोहर पाटील – शिवसेना*
2.      *शैलेश मनोहर पाटील – अपक्ष*
2.5/5 - (6 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे