ब्रेकिंग
शाळेला दिले जाणार मनोज जरांगेंचे नाव,तसे परिपत्रकच केले शाळेने प्रसिद्ध…
अमित जाधव - संपादक
सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेला मनोज जरांगे पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा ठरावही मंजूर झाला. ही शाळा बार्शीच्या मुंगशी दहिटणे येथील आहे. त्यामुळे यापुढे ही शाळा ‘मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी दहिटणे’ या नावाने ओळखली जाईल. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांच्या अध्यक्षेखाली हा ठराव मंजूर करण्यात आला. नाव देण्यास परवानगी देण्याबाबत जरांगेंना संस्थेने पत्र पाठवले आहे.