Breaking
ब्रेकिंग

कोकण क्रांती गणेशपाडा, दिवा आयोजित कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न ,कालो श्री क्रीडा मंडल (चिपळूण) ठरले अव्वल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता ३० जाने : कोकण क्रांती गणेशपाडा, (दातीवली) दिवा आयोजित कला, क्रिडा, सांस्कृतिक व सामाजिक मंडळातर्फे ६५ किलो वजनी गटाच्या भव्य दोन दिवशीय कबड्डी स्पर्धा दिवा शहरातील गणेशपाडा, दातीवली येथे उत्साहात पार पडल्या. मंडळाचे हे तिसरे वर्ष असून सदर स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले होते.

सदर कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक काळोश्री क्रीडा मंडळ. काने, चिपळूण यांनी रोख २० हजार व भव्य स्मृतीचिन्ह पटकावीले. द्वितीय विशाल स्पोर्ट्स ठाणे यांनी रोख १४ हजार व स्मृतीचिन्ह तर तृतीय विशाल स्पोर्ट्स बी यांनी रोख ७ हजार व स्मृतीचिन्ह तसेच चतुर्थ पारितोषिक रोख ४ हजार व भव्य स्मृतीचिन्ह जिकंले आहे. तर सदर कबड्डी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड व सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना विशेष बक्षीस देण्यात आले. सदर दोन दिवशीय कबड्डी स्पर्धेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली तर सदर स्पर्धा पार पडण्यास कोकण क्रांती गणेशपाडा, दातीवली (दिवा) मंडळाच्या सर्व सभासदांनी अपार मेहनत घेतली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे