ब्रेकिंग
दिवा शहरात दोन तरुणांच्या आत्महत्या,ऑनलाईन मोबाईल फ्रोड ने I love you मम्मी पप्पा’चिठ्ठीवर लिहीत तरुणाने जीवन संपवलेतर दुसरा मुलगा हा नशेच्या आहारी असताना राहत्या घरात घेतला गळफास…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
9
दीवा शहरात वाढती लोकसंख्या पाहता रोजगार क्षेत्रात वाढती बेरोजगारी ला कंटाळून अनेक तरुण तरुणी पैसे कमविण्यासाठी शॉर्ट कट मार्गाचा अवलंब करीत असून यामुळे मग मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावात जाऊन तरुण वर्ग आत्महत्या असे टोकाचे पाऊल टाकून जीवन संपवतात.असेच काही आज दिवा शहरात घडले असून ओमकार सावंत २२ वर्षे,शिवम इमारत,दिवा पूर्व अल्पवयीन मुलाने आत्महत्या करत ” मला काही लोकांनी या मोबाईल ऑनलाईन फ्रोड मुळे फसवले आहे मी त्यांचे मोबाईल नंबर लिहिले असून पोलिसांना द्या,परत माझ्या सारख्या कोणाला जीव द्याला नको एवढे बोलून मी जीवन संपवतो I love u मम्मी पप्पा, तुमचा लाडका मुलगा”असे चिठ्ठीवर लिहून अखेर तरुणाने जीवन संपवले.
तर दुसरा मुलगा हर्षद राजू इंगळे ( वय १६) रहाणार सुमन अपार्टमेंट, गावदेवी रोड, दिवा पश्चिम याने गळफास लावून आत्महत्या केली असून हा तरुण अती नशापाणी करीत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले असून पुढील तपास दिवा पोलीस दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किंगरे, पो ना भोसले अधिक तपास करत आहेत.
0
2
0
9
7
9



