अखेर म्हात्रे गेट मधील रहिवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू , माजी उप महापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन….
अमित जाधव - संपादक
मा.डॉ.श्री.श्रीकांत शिंदे (खासदार कल्याण लोकसभा) यांच्या प्रयत्नाने व मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य) यांच्या सहकार्यातून महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या लेखाशीर्षकाखाली बेडेकर चाळ ते मातोश्री नगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे उदघाट्न मा.श्री.रमाकांत मढवी मा. नगरसेवक / शहरप्रमुख, सौ. दर्शना चरणदास म्हात्रे (मा. नगरसेविका), श्री.दीपक जाधव (मा.नगरसेवक), विभागप्रमुख श्री. शशिकांत पाटील, श्री.चरणदास म्हात्रे,श्री. विपुल मुंडे, उपविभाग प्रमुख श्री.सचिन चौबे, श्री.जगदीश भंडारी, श्री.राजेश पाटील शाखाप्रमुख श्री.सुरेश पाटील, श्री. जयदास शेलार, श्री. राजेश पाटील, श्री.भूषण पाटील व मोठया संख्येने परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.संपूर्ण दिव्यातील पाणी प्रश्न येत्या काही दिवसात सुटेल व सर्व दिवावासियाना पाणी पुरवठा सुरळीत होईल असे यावेळी मढवी यांनी स्पष्ट केले



