बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेश विसर्जनाची गैरसोय लक्षात घेऊन पाटील यांनी स्वखर्चातून स्व.जयराम म.पाटील गणेश घाट सुरू ,जवळ जवळ शेकडो नागरिकांनी आपल्या दीड दिवसाच्या गणरायाचे केले विसर्जन…

अमित जाधव-संपादक

 

जवळ जवळ शेकडो नागरिकांनी आपल्या दीड दिवसाच्या गणरायाचे केले विसर्जन

गणेश उत्सवाच्या काळात दिव्यातील साबे गाव येथील नागरिकांची गणेश विसर्जनाची गैरसोय लक्षात घेऊन दिव्यातील मा.नगरसेविका अंकिता विजय पाटील व शाखाप्रमुख सचिन राम पाटील यांनी स्वखर्चातून प्रभागातील नागरिकांना जयराम मंगल्या पाटील यांच्या स्मरणार्थ सुसज्ज असा गणेश विसर्जन घाट निर्मान करून दिला आहे संपूर्ण रस्ता प्रकाशमय करून अनेक पथदिवे जागोजागी दिसत होते परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या दीड दिवसाच्या गणरायाला या विसर्जन घाटात निरोप देत पाटील परिवारांचे आभार देखील मानले.
ठाणे महापालिके कडून देखील विशेष सहकार्य मिळाले प्रसंगी विसर्जन स्थळी योग्य खबरदारी घेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असे पाटील यांनी स्पष्ट केले
यावेळी सचिन राम पाटील यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन विसर्जन स्थळी योग्य पायवाट निर्माण करून तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता तयार केला व लवकरच डांबरी स्वरूपाचा रस्ता तयार करू जेणे करून साबे गावातील नागरिकांची गैर सोय होणार नाही व येणाऱ्या काळात भव्य असे विसर्जन घाट निर्माण करू असे सांगितले व रात्री उशिरा प्रयन्त नागरिक आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यासाठी येत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे