दिवा भाजप चे युवा मोर्चा अद्यक्ष सचिन रमेश भोईर अयोजित अजिक्यतारा दशावतार नाटक हजारो नाट्यप्रेमियांच्या व दिवावासीयांच्या उपस्थित सपन्न….
अमित जाधव-संपादक
भारतीय जनता पार्टी दिवा शहर युवा मोर्चा अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर आयोजित दीपावली निमित्त कोकण वाशियासाठी व दिवा शहरातील बांधवांसाठी कै.सुधीर कलिंगन यांचे सुपुत्र श्री. सिध्देश कलिंगन यांचे श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर प्रस्तुत, *अजिंक्यतारा* (एका अजिंक्य योद्धयाची अजिंक्य कथा) या पौराणिक दशावताराचे आयोजन केले होते.
हजारो नाट्य रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम चांगल्या प्रकारे सादर केला,
प्रथम मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन कार्यक्रमाला सुरवात केली, प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणें जिल्हा अध्यक्ष आमदार श्री निरंजनजी डावखरेसाहेब(कोकण पदवीधर मतदार संघ)विलासजी साठे साहेब ठाणे शहर संघटन सरचिटणीस,शिवाजी आव्हाड साहेब भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस, ठाणें जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग जी मेढेकर, अर्चना पाटील सहसंयोजिका युवती प्रमुख ठाणे शहर जिल्हा,नरेश विष्णू पवार
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,अशोक बाबुराव पाटील ठा.जि. कार्यकारणी सदस्य,रोहिदास मुंडे
मंडळ अध्यक्ष दिवा शहर,दिलीप भोईर,समीर चव्हाण सरचिटणीस, युवराज यादव सरचिटणीस, रोशन भगत ओ. बी. सी. मोर्चा अध्यक्ष, कमलाकर पाटील,सुधीर म्हात्रे ,अजय सिंग उ.भा मोर्चाअध्यक्ष,श्रीराम विनोद भगत,सौ ज्योती पाटील महिला अध्यक्षा,रेशमा पवार , सपना भगत,महेंद्र भगत,मधुकर पाटील,
प्रवीण पाटील,वीरेंद्र गुप्ता, समशेर यादव,जिलाजित तिवारी, प्रपुल साळवी,राजेंद्रआंब्रे, कल्पेश सारस्वत,निलेश भोईर,आशिष पाटील,सुमित मढवी,दुर्गेश मढवी,
दीपेश पाटील,शैलेश भोईर, कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडणारी संपूर्ण युवा मोर्चा टीम, युथ लीडर सचिन भोईर यांच्या कार्याची पोचपावती म्हणून या कार्यक्रमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, कार्यक्रमाच्या मध्यंतरी मान्यवरांनी उपस्थित केलेल्या दिवा शहरातील पाणी, रस्ते, या लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नाला उत्तर देताना सचिन भोईर बोलले की मी आजपर्यंत समाजसेवक म्हणून काम करतोच कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता, बहुजन जनता, माझ्या पर्यंत आली तर मी त्यांना खाली हात पाठवत नाहीं परंतु जर मला नगरसेवक म्हणून संधी दिली तर नक्किच हे महत्वाचे प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून सोडविण्यासाठी योगदान देता येईल आणि जोमाने काम करता येईल, त्यांच्या या उत्तराला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, कार्यक्रमाच्या शेवटी नाट्य रसिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



