ठाणे/दिवा मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. दिव्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीन दिवा शहरात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्व्ये बंधनकारक आहे, असे असतांना देखील दिवा शहरात तसेच राज्यभर दुकानदारांकडून इंग्रजीमध्ये पाट्या लावण्यात आल्या आहेत. म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत असल्याचं यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
यावेळी मनसेचे पदाधिकारी म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनदेखील मराठीमध्ये पाट्या लावण्यात आलेल्या नाही. आज आम्ही फक्त समज पत्र देऊन , त्या दुकानांची दोन दिवसाच्या मुदतीवर समजवणुक करत आहोत. आमचं इशारा आहे की, सर्वांनी मराठीमध्ये पाट्या लावावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने पुन्हा एकदा खळकट्याक करू असा इशारा दिला आहे.
यावेळी दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोनिष माधव -विभाग अध्यक्ष, देवा घाडी – उपविभाग अध्यक्ष, नम्रता खराडे – शाखा अध्यक्ष,दिनेश महाडिक, उदय कुभार,अक्षय धावडे,सूरज कोठारी,राणी वाघमारे,विनायक गावकर, शशीकांत कासले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते