Breaking
ब्रेकिंग

दिव्यात विकास म्हात्रे गेट कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती फरार…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता १५ सप्टेंबर : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट परिसरात पती पत्नीचा कौटुंबिक व घरगुती कारणामुळे पतीने राहत्या घरातच धारदार हत्याराने पत्नीवर वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने मयत पत्नीच्या नातेवाईकास फोनवर कळवून फरार झाला आहे. प्रसंगी घटनास्थळी दिवा (मुंब्रा) पोलीस दाखल होऊन सदर महिलेचा मृतदेह कळवा छत्रपती शिवाजी रूग्णालय येथे पाठवला आहे .आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त बुरसे, उत्तम कोळेकर सह पोलिस आयुक्त तसेच वपोनि अनिल शिंदे तसेच पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर , दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक के. के. तांबे, वसंत खतले आणि राजेंद्र तोरडमल आदी पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर होते. प्रकरणी मुंब्रा पोलिस स्टेशन  गुन्हा दाखल असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे