ब्रेकिंग
अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी आमदाराकडे 1 कोटीची खंडणीची मागणी..
अमित जाधव - संपादक
अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बीडमधील एका माजी आमदाराकडे 1 कोटीची खंडणीची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. या माजी आमदाराने 25 हजारांची खंडणी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह एक स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.