मुंबई हाजीआली येथे दरड कोसळलून रस्ता खचला…
अमित जाधव-संपादक
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून बरसणारा पाऊस आजही दिवसभर बरसत राहिला. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला हाजी अलीमधील कॅडबरी जंक्शनजवळ नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, त्यामुळे पालिकेचा फुटपाथ खचला.मुंबईत 5 ऑगस्ट 2020 मुसळधार पावसामुळे मलबार हिल येथील संरक्षक भिंत कोसळली आणि रस्ता खचला होता. दोन वर्षांनंतर रस्त्याचे काम हाती घेतले असतानाच गुरुवारी कॅडबरी जंक्शन येथे दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटनास्थळी जिऑलॉजिस्ट भेट देऊन पाहणी करणार असून नुकसानीचे मूल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. दरम्यान, इमारतीच्या माध्यमामुळे फुटपाथ खचला आहे. त्यामुळे तो दुरुस्त करून द्या, असे निर्देश संबंधित कंत्राटदाराला डी वॉर्डचे साहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिले आहेतm