दिव्यात अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरेल, असे मोफत वंध्यत्व निवारण मोफत शिबिर….
अमित जाधव - संपादक
अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरेल, असे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर येत्या रविवारी (ता. २८) दिव्यातील निर्माण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर वतीने दिवा चंद्रघन सोसायटी येथे आयोजित केली आहे असे येथील डॉक्टर यांनी ही माहिती दिली. सकाळी अकरा ते सायंकाळीं सहा या वेळेत हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये अपत्यहीन जोडप्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले मोफत दिले जाणार असून दिव्यातील व आसपास शहरातील अपत्यहीन जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती सेंटर च्यावतीने देण्यात आली.
‘तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ’ हे ब्रीद असणाऱ्या निर्माण टेस्ट ट्यूब बेबी सेंटरन अनेक वर्षांच्या प्रवासामध्ये हजारांहून अधिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करून दिले आहे. तंत्रज्ञान आता खूपच पुढे गेले असून अपत्य नसलेल्या जोडप्यांनी या शिबिरात एकदा अवश्य येऊन मार्गदर्शन घ्यावे, अपत्यप्राप्तीचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी निश्चित मदत होईल, असा विश्वास येथील डॉक्टर मानकर यांनी व्यक्त केला.
वारंवार आययुआय व आयव्हीएफ अयशस्वी होणाऱ्या जोडप्यांना पुढील आयव्हीएफ उपचारामध्ये विशेष सवलत दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच सोनोग्राफी व इतर सुविधा मोफत कऱण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी ९१५२०१६३१४ किंवा ८६९२९०९७९७ येथे संपर्क साधावा.




