बहुजनांचे शिक्षण मंदीर, पब्लिक स्कूल दिवा!

शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणं घेणे, खुप खर्चिक असल्याकारणाने अजुनही, काही बहुजन वर्गातील मुले शिक्षणं आणि समाज या पासुन कोसो लांब आहे. परंतु याला अपवाद, ठाणे जिल्ह्यातील आणि दिवा ग्रामीण भागातील, एक संस्था अपवाद आहे.
द्रोणाचार्य फाऊंडेशन संचलित, पब्लिक स्कूल दिवा या शाळेचा शैक्षणिक उपक्रम हा बहुजन समाजातील विद्यार्थी घडविण्याचा आहे. अनेक गरीब, वंचित विद्यार्थी/पालक यांचे, पब्लिक स्कूल ही शाळा नसून, एक शैक्षणिक मंदीर आहे, अशीच भावना शेकडो पालक आणि विद्यार्थांची आहे.आणि याचे कारणं म्हणजे या शाळेची असलेली,माफक फी. अत्यंत अल्प फी घेऊन या ठिकाणी विद्यार्थी घडऊन,एक शैक्षणिक पुण्यकर्म केले जाते. संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना पाठ्य-पुस्तके आणि ईतर शालेय स्टेशनरी मोफत दिली जाते. संस्थेच्यावतीने अनेक सामुग्री जैसे पोषण आहार,दुध म्हणून मुलांना मध्यान्ह आहार दिला जातो. कला- क्रीडा क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून, आय.पी.एल क्रिकेट सामने स्टेडियममध्ये पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येकी इयत्तेतील सर्वगुण संपन्न विद्यार्थांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची स्कॉलरशिप देऊन, त्यांचा आर्थिक भार कमी केला जातो.पर्यावरण आणि जंगल यांचे संवर्धन का केले पाहिजे, याची माहिती व्हावी म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून,जंगलाची आणि शेतीची विद्यार्थांना माहिती देऊन,प्रत्यक्ष मुलांकडून प्रात्यक्षिके करून घेतली जातात. आजचा विद्यार्थी, उद्याचा सजग भारतीय नागरीक कसा घडेल, यांवर संस्थेचे लक्ष असते. शिक्षणातून विकास आणि विकासातून देश घडला पाहिजे, हे ध्येय बाळगून विद्यार्थांना मॅरोथान, चित्रकला स्पर्धा यामधून त्यांचें कौशल्यगुण पाहीले जातात आणि त्यांना प्रोत्साहीत केले जाते.
विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अवगत व्हावे यासाठी ईतर दानशूर एन.जी.ओ मार्फत लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले आहेत. पब्लिक स्कूलचा शैक्षणिक दर्जा पाहdता, दिवसेंदिवस पट संख्या विद्यार्थ्यांची वाढत आहे, परंतु एक खेदजनक गोष्ट ही आहे की, संस्थेची अजुन स्वमालकीची जागा वा ईमारत नाही आहे.आजच्या युगात जागा घेणे आणि ईमारत बांधणे हे खर्चिक कामं या संस्थेस झेपणे कठीण आहे.कारण सदर संस्था ही अत्यल्प आणि माफक फी आकारून,शिक्षण दानाचे पुण्यकर्म करीत आहे. आणि शाळेचा शैक्षणिक गुरुजन वर्ग ही विद्याविभूषित असून, ते ही अत्यंत कमी मानधन घेऊन, या शैक्षणिक यज्ञाचे भागीदार होऊन,अत्यंत उच्च ज्ञानदानाची शिदोरी विद्यार्थ्यांना पुरवित आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,जादा तास घेऊन विद्यार्थांना अभ्यासात परिपुर्ण आणि निपुण केले जाते. एक मात्र वानवा आहे, या शाळेसाठी एक ग्रंथालय उपलब्ध झाले तर अजुन, विद्यार्थी या ठिकाणी समग्र ज्ञान संग्रहीत करतील याची खरोखर खात्री वाटतें. आणि अशा सर्वगुण शालेय संस्थेस सरकार अथवा एन.जी.ओ यांनी सढळहस्ते मदत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे,अशी आशा व्यक्त करतो.*
*मी एक पालक म्हणून या पब्लिक स्कूल दिवा शाळेचा चाहता असुन, माझा ही मुलगा याच शाळेचा एक गुणवान विद्यार्थी आहे. पब्लिक स्कूल आणि पालक हे आमचे कौटुंबिक नाते असुन,अशा शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाशी संबंधित असणाऱ्या संस्थेचे आम्हीं घटक आहोत,याचा खरोखर सार्थ अभिमान आणि गर्व आहे. आम्हीं अनेक शाळा पाहिल्या,परंतु पाल्य – पालक यांचा विचार करून त्यांना मदत करणारी फक्त, पब्लिक स्कूल दिवा!