ब्रेकिंग
दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनीतील नवाजलेला भव्य रास गरबा,आदर्श मित्र मंडळ आयोजक सौ सपना रोशन भगत यांचा,पहिल्याच दिवशी महिलांचा ,मुलींचा उत्साह वखान्याजोगा….
अमित जाधव - संपादक
शारदीय नवरात्रौत्सव उत्सव यंदा दिव्यात मोठया प्रमाणावर साजरा होत असताना दिसत आहे प्रत्येक ठिकाणीं अनेक राजकीय पक्षांनी व समाजसेवक यांनी यंदा नवरात्र उत्सवाच आयोजन केले आहे.
याचा प्रतेय दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी तील आदर्श मित्र मंडळ आयोजित सपना रोशन भगत व रोशन भगत (भाजप ओबीसी मोर्चा)यांच्या वतीने भव्य दिव्य रास गरबा व शारदीय नवरात्रौत्सव मोठया प्रमाणावर साजरा होत आहे.
पहिल्याच दिवशी आदर्श मित्र मंडळाच्या रास गरब्यात हजारो महिला , मुला मुलीं व युवा वर्ग सहभागी होत गरब्याचा आनंद लुटत असताना दिसत होते.
दिव्यातील नवाजलेल्या या शारदीय नवरात्रौत्सवात नऊ दिवस विविध उमक्रमाची रेलचेल असते असे सौ.सपना रोशन भगत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले