अनधिकृत बांधकाम विरोधात बातमी केल्याचा रागाने पत्रकाराला धमकावणे पडले महागात, टिटवाळा पोलिस स्टेशन अंतर्गत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल…
अमित जाधव - संपादक
टिटवाळा -बातमी लावल्याचा राग मनात घरून, कल्याण तालुक्यातील खडवली परिसरातील पत्रकार मंगेश जयराम तारमळे यांच्यावर हल्ला करून धमकावणाऱ्या चिंचवली गावातील जयराम घोडविंदे ह्या माथेफिरूवर अखेरीस टिटवाळा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध भुमफिया, चाल माफिया आणि सराईत गुन्हेगार हे नेहमीच ह्याआला परिसरातील पत्रकारांना धमकावत असतं व काही प्रसंगी हल्ले ही झाले आहेत पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेता हा गुन्हा दाखल होणे खुपचं गरजेचे होते. त्यामुळे पत्रकारांचे मनोबल उंचावले असुन लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे
अशी प्रतिक्रिया ह्या परिसरातील पत्रकारांनी व्यक्त केली आहे तसेच ह्या प्रकरणातील तालुका (टिटवाळा) पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार रकमजी तसेच कल्याण तालुका पोलिस प्रमुख पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर यांनी तत्परता दाखवून आरोपीवर गुन्हा दाखल केल्याबद्दल आभार मानले आहेत. आरोपी जयराम घोडविंदे यांच्यावर महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक ) अधिनियम २०१७ अन्वये कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३२३ व ५०६ सुद्धा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ अन्वये दाखल गुन्हा हा दखलपात्र व अजामीनपात्र असुन आरोपीस ३ वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अश्या शिक्षेचं प्रावधान आहे



