लक्ष्यवेध इन्स्टिटयूट आयोजित ठाणे येथील सर्वात मोठा MSME expo – बिझनेस जत्रा….
अमित जाधव - संपादक
लक्ष्यवेध इन्स्टिटयूट आयोजित ठाणे येथील सर्वात मोठा MSME expo – बिझनेस जत्रा २०२३ दिनांक १ आणि २ डिसेंबर २०२३ रोजी, टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे संपन्न होणार आहे. बिझनेस जत्राचे हे तिसरे पर्व असून, या उपक्रमाचे MSME क्षेत्रात आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांमध्ये विशेष स्थान आहे.
बिझनेस जत्रा २०२३ साठी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड Joy e-bike मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत.
त्याचप्रमणे Quik Shef, Urban Ayureved, Voltas Air Conditioners आणि पितांबरी उद्योग समूह यांनी सहप्रायोजकत्वाच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले आहे.
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये १२० पेक्षा उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल, १०,००० पेक्षा अधिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
*लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट* आणि *ॲडमार्क मल्टीवेंचर्स*, *वा कोर्पोरेशन*, *वेल्थ मॅजिक* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये १२० पेक्षा उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल आणि १०,००० पेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र शासन, MIDC, MSME, NSIC, ठाणे महानगरपालिका, विविध बँका आणि ५० हून अधिक व्यावसायिक संघटनाचे विशेष सहकार्य *बिझनेस जत्रा २०२३* साठी लाभले आहे.
बिझनेस जत्रा २०२३ मध्ये Industry 4.0, ब्रँडींग, महिला उद्योजकता, व्यावसायिक संघ व्यवस्थापन, व्यवसायाचे आर्थिक नियोजन आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना यासंदर्भात चर्चासत्र आणि परिसंवादाच्या माध्यमातून दिग्ग्ज व्यक्तींचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे.
दिग्ग्ज व्यक्तींच्या हस्ते नवीन उत्पादने व सेवा यांचे अनावरण करण्यासाठी बिझनेस जत्रा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून यंदाही Lahs Green India Pvt Ltd निर्मित विशेष सेवेचे – Tow – Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go. चे अनावरण करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने Tow – Go या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे.
बिझनेस जत्रा २०२३ – सोहळा उद्योजकतेचा, उत्सव महाराष्ट्रीय लघुद्योजकांचा..!
ठाणे येथील सर्वात मोठ्या एमएसएमई एक्स्पोमध्ये सहभागी व्हा आणि व्यवसाय वृद्धीच्या अमर्याद संधीचा लाभ घ्या.



