
आज ठाण्यात दिनांक २१/१०/२०२४ रोजी २०:०५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार १९:०० वाजताच्या सुमारास रेमंड कॉम्प्लेक्स, पोखरण रोड नं. ०१, वर्तकनगर, ठाणे (प) या ठिकाणी विस्टा बिल्डिंगच्या ए विंग (तळ + ४१ मजली) मधील एका लिफ्टचा (तळ मजल्यावरून वरती जात असताना) रोप लिफ्ट पहिल्या मजल्यावर असताना तुटला दरम्यान सदर लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडरसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते.सदर ठिकाणी अपघातग्रस्त लिफ्ट मध्ये एकूण ०४ – व्यक्ती होत्या त्यातील एका मुलाला अत्यंत किरकोळ दुखापत झाली आहे असे यावेळी समजले आहे सदर तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.