Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभाग आणि ठाणे शहरकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन ,ठाणेकरांचा आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद ,पत्रकार हा एक सामाजिक कार्यकर्ता – डॉ विश्वासराव आरोटे…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 5

ठाणे ता १ जानेवारी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व महासचिव डॉ विश्वासराव आरोटे यांच्या जन्मदिनी ठाण्यात टाऊन हॉल मध्ये पत्रकार दिन विशेष, भव्य आरोग्य शिबिर, दिनदर्शिका प्रकाशन, वैद्यकीय योजना कार्ड वाटप, पत्रकार शिबिर गौरव पुरस्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन
निवृत्त माहिती संचालन महाराष्ट्र शासन श्री देवेंद्र भुजबळ, संकपाळ उद्योग समूहाचे संचालक डॉ. संभाजी संकपाळ,माजी नगरसेवक संजय तरे, महेश्वरी तरे ,समाजसेवक धनंजय सिंग सिसोदिया, प्रमुख सल्लागार ठाणे शहर प्रमोद इंगळे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. टायटेन मेडिसिटी, संस्कार सेवा संस्था व ओम ॲक्युप्रेशर व हाडवैद्य यांच्या विद्यमानाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ठाण्यातील तमाम नागरिकांनी मोफत योग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील या शिबिरात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांनी कसे काम करावे व फक्त बातम्या यांच्या पुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्य करावे असेही संबोधन केले त्याचबरोबर पत्रकारांच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले. प्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शारदा विद्यालय, वयम मासिक, बेहरूम सोलमन ( आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू ), भानुदास शिंदे ( शैक्षणिक ), उमा माळी ( सामाजिक ), सार्था गोरे ( मिस इंटरनॅशनल नक्षत्र ), अमित सिंग ( उद्योजक ), डॉ. वनिता गडदे ( सामाजिक ), मनस्वी चौधरी ( पत्रकार ), प्रवीण जाधव ( पोलीस सब इन्स्पेक्टर ), गोरख पाटील ( सामाजिक ), विश्वनाथ थोरात ( सामाजिक ), उषा कोथमीरे (सामाजिक), जयश्री जाधव ( सामाजिक ), महेश कदम ( उद्योजक ), प्रभाकर जाधव ( ज्येष्ठ साहित्यिक ) इ. इत्यादी पुरस्कार त्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, याप्रसंगी टायटेन मेडिसिटी यांच्यावतीने ठाण्यातील पत्रकारांना वैद्यकीय योजना कार्ड वाटप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर जिल्हा दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले.

प्रसंगी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा बोलपट प्रदर्शित करण्यात आला. प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांना “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या सोहळ्याचे निवेदन ठाणे शहर जिल्हा सचिव सुबोध कांबळे यांनी केले यावेळी कोकण विभाग व ठाणे शहर च्या वतीने पत्रकार म्हणजे केवळ जाहिरात आणि बातमी नव्हे तर सामाजिक जाणीवेतुन या कार्यक्रमाची संकल्पना उभी करण्यात आली. या कार्यक्रमात ठाण्यातील विलास शंभरकर कोकण संपर्कप्रमुख, उपाध्यक्ष मंजीत सिंग अरोरा, उपाध्यक्ष संतोष पडवळ, सचिव सुबोध कांबळे, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, संघटक मीनल पवार, वृत्तवाहिनी प्रमुख अमित जाधव, छायाचित्रकार प्रमुख सुभाष जैन, समाज माध्यम प्रमुख राजेंद्र गोसावी, संदीप पालवी, प्रसिद्धी प्रमुख अमित गुजर, सहसचिव अश्विन कांबळे, देवेंद्र शिंदे कार्यकारणी सदस्य अशोक मेहता, कपूर धारवाड, गणेश गव्हाणे, राहुल लोखंडे, देवेंद्र वायरकर, रूपाली कदम, संजय अधिकारी, सचिन बनकर, तुषार डबरे, राहुल अहिरे, भानुदास शिंदे, ऋतिक निकाळे, शुभम पाटील, रोहिदास पाटील आणि मीनाक्षी देशमुख हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे