ब्रेकिंग
आषाढी एकादशी निमित्त दिवा शहरातील कारवी इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिंडी व वेशभूषेचे आयोजन…
अमित जाधव - अमित जाधव

ठाणे : आषाढी एकादशी निमित्त दिवा शहरातील कारवी इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई आणि वारकरी यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.प्रसंगी शाळेत आषाढी निमित्त विद्यार्थ्यांकडून भक्तीमय वातावरणात विठूनामाचा गजर पहावयास मिळाला. संपूर्ण शैक्षणिक वर्षात अनेक विविध पारंपारिक व संस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जात असतात असे संचालक रवींद्र वानखेडे यांनी बोलताना स्पष्ट केले यावेळी प्राध्यापक कविता खंडेराव या उपस्थित होत्या.