बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहर वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या उत्साहात लोकार्पण….

अमित जाधव-संपादक

दिवा शहर वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या उत्साहात लोकार्पण….

काल रविवार दि.११/०९/२२, दिवा शहर विभागीय वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात लोकांच्या असंख्य उपस्थितीत मध्ये संपन्न झाला,महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा माईताई कांबळे व ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अनभोरे यांच्या हस्ते रिबीन कापुन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करन्यात आले यावेळी उपस्थितां मध्ये ठाणे जिल्हा महासचिव जयवंत बैले ,जिल्हा महीला महासचिव रेखाताई कुरवारे, ठाणे शहर महासचिव मोहन नाईक उपाध्यक्ष वानखेडे, उपाध्यक्ष प्रताप जाधव,थोरात साहेब उपाध्यक्ष ठाणे शहर, संदिप शेळके ठाणे शहर सचिव, आय.टी हेड,रविंद्र कांबळे,ऍड.विलास सुर्यवंशी ठाणे शहर संघटक, अनिल सोनोने घोडबंदर विभाग अध्यक्ष,मुंब्रा विभाग अध्यक्ष मिलिंद कांबळे,मु़ंब्रा विभाग उपाध्यक्ष संजय बोरकर, मुंब्रा महिला अध्यक्षा कल्पनाताई सुर्यवंक्षी ,सुधाकरराव कांबळे,नितेश इंगोले ,नंदन खैरे उपस्थित होते…सदर जनसंपर्क कार्यालयामुळे दिवा शहरातील बहुजन बांधवांचे समस्यांचे निवारण करन्यात येईल व गोर गरीबांना मदतीचे केंद्र म्हणुन उपयोग होईल तसेच जन सामान्यांच्या हक्कासाठी सदर पक्ष कार्यालय सदैव खुले असेल असे दिवा शहर अध्यक्ष मिलिंद गवई यांनी ग्वाही दिली…सदर उद्घाटनाला पक्षाचे मुंबई विभागीय पदाधिकारी,ठाणे शहर पदाधिकारी उपस्थित होते तसेच दिवा विभागातील अनेक सामाजीक व धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे