दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सात दिवस मोफत प्रशिक्षण शिबिर… मा. आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने आयोजन..
अमित जाधव - संपादक

दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुमित मिञ मंडळ आयोजित मा.आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने फॅब्रिक पेंटिंग व आरी वर्क्स चे मोफत ७ दिवसाचा प्रशिक्षण कोर्स आज पासून महिला वर्गांच्या मोठ्या संख्येने सुरू झाला आहे यात महिलांना यात अनेक प्रकारचे कोर्स शिकविले जाणार आहेत.कटवर्क आरी भरतकामाची कला समजली जात असून कटवर्क आरी भरतकाम हे एक अद्वितीय तंत्र आहे ज्यामध्ये क्लिष्ट डिझाईन्स तयार करण्यासाठी फॅब्रिकचे काही भाग कापले जातात. उरलेले कापड नंतर विशिष्ट आरी सुई वापरून गुंतागुंतीच्या टाक्यांसह सुशोभित केले जाते. कटिंग आणि स्टिचिंगच्या या संयोजनामुळे आकर्षक पॅटर्न तयार होतात जे दिसायला आकर्षक आणि संरचनात्मकदृष्ट्या सुंदर असतात.
या सात दिवसाच्या प्रशिक्षणामुळे दिव्यातील अनेक महिला आत्मनिर्भर होऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने आम्ही हे मोफत असे प्रशिक्षण शिबिर सात दिवस आयोजित केले आहे तसेच महिलांना अनेक बाबतीत सहकार्य देखील करण्यात येईल असे यावेळी मा.आमदार सुभाष भोईर यांच्या निकटवर्तीयांनी बोलताना स्पष्ट केलं