दिव्यात महिला व बालविकास प्रकल्प ठाणे अंतर्गत अंगणवाडी आहार पारेषण कार्यक्रम संपन्न…
अमित जाधव-संपादक
दिव्यात महिला व बालविकास प्रकल्प ठाणे अंतर्गत अंगणवाडी आहार पारेषण कार्यक्रम संपन्न

महिला व बालविकास प्रकल्प ठाणे 3 अंतर्गत प्रकल्प अधिकारी सौ योगिता जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्य सेविका सौ प्रतिभा सातवी मॅडमच्या प्रमुख उपस्थितीत आज दिवा आगासन येथे आहार पोषणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेवक श्री दीपक जाधव आणि नगरसेविका सौ सुनीताताई मुंडे यांना उपस्थित होते त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र शिळ येथील आरोग्य सेविका परिचारिका सौ शेलार मॅडम आणि त्यांचे सहकारी आशा वर्कर्स मोठ्या प्रमाणावर हजर होत्या या कार्यक्रमांमध्ये पालकांना आहार आणि पोषण याचे महत्त्व समजावून सांगितले तसेच अंगणवाडी मधील 0 ते 6 वयोगटातील सुदृढ बालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून आहार आणि लसीकरणाबद्दल माहिती देण्यात देऊन सक्षम करण्याचा मानस व्यक्त केला त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सौ सुवर्णताई कदम यांनी प्रमुख पाहुण्यांना अंगणवाडीच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सोयी आणि सुविधा यांच्या बद्दल व्यवस्थित माहिती सांगितली त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील सन्मान करून सहकार्य केले सर्वांनीच खूप छान पद्धतीने कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला त्याचबरोबर सर्वांनी सकस आहाराच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून आणण्यात आल्या होत्या त्या पाककृतींमध्ये स्पर्धकांचे नंबर काढण्यात आले किशोरवयीन मुली यांनि सुंदर स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली व त्यांना बक्षीसही देण्यात आले उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आहार पोषणावर एक अभिनय गीत सादर केले तसेच एक आहार आणि लसीकरण यावर पाळणाही गीत सादर केले यांचे मनापासून धन्यवाद तसेच या कार्यक्रमास विशेष मेहनत घेतल्याबद्दल सरिताताई शेळके यांचे विशेष आभार मानले



