दिव्यात चोरांचा सुळसुळाट, मेन स्पॉट ठरत आहेत गर्दीचे ठिकाणे, लहानगीच्या गळ्यातून सोन्याचे लॉकेट केल चोरी…
अमित जाधव - संपादक

दिवा – दिव्यात सायंकाळच्या सुमारास वकील रविराज बोटले यांच्या मुलीच्या गळ्यातून भर जत्रे मधून सोन्याचे लॉकेट चोरी झाले आहे. त्या संदर्भात त्यांनी शीळ डायघर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिव्यातील बेकायदेशीर बाजार, जत्रा,मेळा भरत असून ही ठिकाण चोरट्यानी हेरून अनेकांच्या चोरीच्या वस्तू लंपास करत आहे त्यामुळे दिवसेंदिवस मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीत व डायघर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
आई व पत्नीसह मुलीला बाजारात घेऊन जाताना दिवा शीळ रोडवर पटेल मार्ट च्या बाजूला लागलेल्या दिवा फेस्टिव्हल या जत्रेत मुलीच्या हट्टपायी गेलो असताना तेथेच चोरीचा प्रकार झाला आहे असा दाट संशय व्यक्त करत ऍड. रविराज बोटले यांनी डायघर पोलीस स्टेशनं मध्ये जाऊन रीतसर तक्रार देत अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय सहिंता नुसार कलम 303 चा गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश शिरसकर करत असून लवकरच आरोपी ला अटक करू असे यावेळी कळविण्यात आले आहे



