ब्रेकिंग
विक्रोळीच्या टागोर नगरमधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेत केली आत्महत्या..
अमित जाधव - संपादक
रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
मुंबई- विक्रोळीच्या टागोर नगरमधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेत आत्महत्या केली. गौरव भोसले असे 38 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. तो 26 जूनला रुग्णालयात अशक्तपणा आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने अॅडमीट झाला होता. पण त्याने आज पहाटे रुग्णालयातील स्वच्छतागृहात गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.